महिला किसान दिनाला प्रतिसाद

| माणगाव | वार्ताहर |

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत महिला किसान दिनाचे आयोजन मौजे रिले, तालुका माणगाव येथे करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, माणगाव अजय वगरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, सेंद्रिय शेती व महिलांसाठी कृषि विभागाच्या योजना याबद्दल मार्गदर्शन केले. या महिला किसान दिनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक हर्षा अमृसकर, रोहा यांनी उपस्थित महिला शेतकरी गटांना गटांमार्फत व्यावसायिक संधी, विविध कृषि उत्पादने, ब्रॅण्डिंग व पॅकेजिंग, प्रक्रिया उद्योग यांबद्दल सर्विस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. दडेमल, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, रेपोली यांनी उपस्थित महिला बचत गटांना फुल शेती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांना प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास गावच्या सरपंच सुषमा वाघमारे, गावचे अध्यक्ष तुळाजी दिवेकर, विनोद वाघमारे, कृषि सहाय्यक नंदू ठाकरे, अमोल गावडे, प्रमोद शिंदे, तंत्रज्ञान व्यवस्थापक, प्रगतशील शेतकरी व गावातील बचत गटांचे 85 सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version