उरण तालुक्यात योग दिनाला प्रतिसाद

। उरण । वार्ताहर ।
उरण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्याबरोबरच काही योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. बीपीसीएल, ओएनजीसी, फुंडे कॉलेज, गेट वे टर्मिनल, अनमोल इंग्लिश स्कूल, कोंकण ज्ञानपीठ कॉलेज, सीआयएसएफ, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय उरण, इंडियन नेव्ही आदी ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. सर्वच ठिकाणी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. योग शिक्षक दिनेश घरत, प्राजक्ता सर्वया, निकिता नारायण पवार, पूनम चव्हाण, बी. के. डिम्पल दीदी आदींनी योग करून दाखविल. योगामुळे मानवी शरीर लवचिक होते व आरोग्य सुधारते. जीवन सुखी व निरोगी बनते. शांत झोप लागते. आयुष्यात योगाचे अनन्य साधारण महत्व आहे, असे प्रतिपादन योगाचार्य दिनेश घरत यांनी व्यक्त केले.

Exit mobile version