‘कृषीवल’च्या बातमीने प्रशासनाला आले शहाणपण
| पेण | प्रतिनिधी |
ऐन गणपती उत्सवाच्या काळात पेण अंतोरा रोडवर जवळपास 20 ते 25 दिवस लाईटीचा पत्ताच नव्हता. ही बाब लक्षात घेऊन दैनिक कृषीवलमध्ये बामती प्रसिद्ध झाली. आमदारांच्या घरासमोर झगमगाट, मात्र अंतोरा रोड अंधारात. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाचे खडबडून डोळे उघडे झाले.
अंतोरा रोडवरील विद्युत लाईनीमध्ये असलेले बिघाड शोधून काढून तातडीने लाईट सुरू केली. याचाच अर्थ काय, वाभाडे काढल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही. गेली 20 ते 25 दिवस पूर्ण अंतोरा रोडसह थिम पार्कमध्ये लाईटचा पत्ता नव्हता. नागरिकांचे प्रशासनाच्या चुकीमुळे हाल होत होते. मात्र, कृषीवलमध्ये बातमी येताच लगेचच लाईट पूर्ववत सुरू झाली.