| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चौधरवाडी गावातील बंद असलेला वीजपुरवठा पुन्हा कार्यान्वित झाला आहे. या ठिकाणी असलेल्या वीज रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने 18 जानेवारीपासून आदिवासी ग्रामस्थ अंधारात होते. दरम्यान, महावितरणकडून नवीन वीज रोहित्र रविवारी रात्री बसविण्यात आल्याने वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे.
मोग्रज ग्रामपंचायत मधील चौधरवाडी या गावासाठी वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र बिघडले होते. त्यामुळे हे गाव पाच दिवस अंधारात होते आणि त्यामुळे ग्रामस्थ शंकर चौधरी यांनी सर्व ग्रामस्थांसह माजी आ0 सुरेश लाड यांची भेट घेतली. त्यावेळी युवक कार्यकर्ते भास्कर दिसले आणि ऋषिकेश राण यांनी पनवेल येथे नादुरुस्त वीज रोहित्र नेवून त्याची दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यामुळे पाच दिवसांनी वीज रोहित्र चौधरवाडी येथे आणण्यात आले. या गावातील 63 केव्हिए क्षमतेच्या वीज रोहित्रामधून चौधरवाडी तसेच जाधववाडी या गावात वीजपुरवठा होत होता. त्यावेळी महावितरणचे कशेळे येथील शाखा अभियंता साबळे हे उपस्थित राहून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.
महावितरण विभागाच्या कर्मचार्यांना स्थानिक ग्रामस्थ अशोक मेचकर, ऋषिकेश राणे, रमेश मराडे, गणेश म्हसे, महेश म्हसे, भरत शिद, विलास भला, अक्षय तिटकारे, महेश जाधव यांच्यासह चौधारवाडी आणि जाधववाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. त्या सर्वांच्या मेहनतीमुळे वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला आहे.