| कोर्लई | वार्ताहर |
मुरूड अलिबाग मार्गावर असलेल्या पुलाच्या दुरुस्ती मुळे साळाव पुलावरुन मुरूड आगाराची एस.टी. सेवा बंद आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यातील असंख्य प्रवाशांचे हाल झाले आहेत. यातून तातडीने पर्याय काढण्यात यावा. अन्यथा याविरोधात प्रवासी व नागरिकांच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी देण्यात आला आहे.
साळाव पुलाचे डागडुजीचे काम चालु आहे. ही बाब गरजेची आहे. त्यात शंका नाही. पण हे सर्व करत असताना प्रवाशांचे व पर्यटकांचे खुप हाल होत आहे. त्यात मुरूड डेपोतील गाड्या अलिबाग डेपोकडे वर्ग केल्यामुळे त्रास होत आहे. कारण कुठलीही गाडी वेळेत नसते. मुरूडमधील एस्टीबसेसची संख्या कमी झाल्यामुळे मुरुड बोरवली ही एकच गाडी आहे. ती भालगांव मार्गे जाते. साळाव चणेरा मार्गे एकही गाडी नाही. मुरूड- मुलुंड ही संध्याकाळची गाडी बंद केली आहे. 3:30 ची गाड़ी बंद गेल्यानतंर मुरूड डेपोतून 5:30 ची एकच गाडी आहे. त्यामुळे पर्यटकांना व स्थानिकांना भयानक परिस्थितीला तोंड दयावे लागत आहे. त्यामुळे कशा पध्दतीने प्रवास करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच मुरूड डेपोतील कर्मचारी यांनाही अलिबाग येथे हलविण्यात आल्या आहेत. गाडया सुरळीत चालु करण्यासाठी कर्मचारीवर्ग नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच गाडया ची संख्या कमी असल्यामुळे गाड़ी जेव्हा येईल तेव्हा निघेल असे प्रवाश्यांना सांगितल जात. दोन दोन तास वाट बघावी लागते. या अशा पध्दतीने गाडया लेट होत राहील्यातर प्रवाश्यांनी प्रवास कसा करायच मुरूड डेपोतील एसटी बसेसे व कर्मचारीवर्ग आलिबाग डेपोत वर्ग केल्यामुळे मुरूड डेपोत एसटी बसेस व कर्मचारीवर्गाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रवाश्यांची, पर्यटकांची गैरसोय होत आहे.याबाबत एसटी विभागीय अधिकार्यांनी या विषयावर गांभिर्याने चर्चा करावी. आणी यातुन जनतेला लोकांना न्याय मिळवून दयावी ही विनंती. नाहीतर जनतेसाठी विनाकारण अंदोलन कराव लागेल. याची नोंद घेण्यात यावी. असा इशारा पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळाच्या वतीने देण्यात आला असल्याचे गायकर यांनी सांगितले आहे.