| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधगड-पाली परिसरात अतिवृष्टीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून पुन्हा सुरू केला आहे. ट्यूब-बोटीच्या साहाय्याने पाण्यात उतरून त्यांनी दुरुस्ती केली आणि अखेर परिसरात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे.
सुधगड तालुक्यातील पाली परिसराचा वीजपुरवठा अतिवृष्टीमुळे खंडित झाला होता. पहाटे अडीच वाजता 220/22 केव्ही कानसई ईएचव्ही उपकेंद्रातून येणारा 22 केव्ही टेंभी इनकमर ट्रिप झाल्याने टेंभी स्विचिंग उपकेंद्रावरील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. घटनेनंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी तात्काळ लाईन पॅट्रोलिंगचा प्रयत्न केला. मात्र, अंबा नदीवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने दुरुस्ती विलंबली. सकाळी पाणी ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घोडसई ए.बी. स्विचपर्यंत लाईन चार्ज केली. त्यानंतर वझरोली भागात खोल पाणी असल्याने थेट प्रवेश कठीण झाला. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी वाहनांच्या ट्यूब्सद्वारे तात्पुरती नाव तयार केली. त्या साहाय्याने ए.बी. स्विच ऑपरेट करून वझरोलीपर्यंत लाईन चार्ज करण्यात यश मिळाले.
जीव धोक्यात घालून वीजपुरवठा पूर्ववत
