सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची सभा उत्साहात

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाची सभा गुरुवारी (दि.16) सकाळी 11 वाजता अलिबाग येथे संघटना अध्यक्ष जी.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सभेत सेवानिवृत्त कर्मचारी यांचा अलिबाग ठिकाणी मेळावा घेण्यात यावा. हा मेळावा जून 24 अखेर तिसर्‍या, चौथ्या आठवड्यात घ्यावा. प्रत्येक तालुक्यातील सेवा निवृत्त कर्मचारी यांनी सहभाग घ्यावा. तालुक्यातील कर्मचारी उपस्थित राहण्याची जबाबदारी जे सदस्य ग्रुपवर अ‍ॅक्टिव्ह असतात, त्यांच्याकडे जबाबदारी सोपावावी. येणार्‍या सदस्यांची सोय व्यवस्थित होत आहे की नाही याकरिता पदाधिकारी यांनी एक शिष्टमंडळ नेमावे. मेळाव्यामध्ये जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी हे सामाजिक, राजकीय सेवा करत असल्यास त्यांना आमंत्रित करावे. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कॅफो इ. आमंत्रित करावे. कर्मचारी प्रलंबित प्रश्‍नांकरिता पेन्शन अदालत बोलाविण्याकरिता सीईओंना पत्र देणे, प्रलंबित प्रश्‍न ज्या कर्मचार्‍यांचा आहे, त्यांनी सीईओ, एचओडी यांना दिलेल्या पत्राची प्रत संघटनेस देणे. कॅफोंना ऑनलाईन प्रणालीकरिता आवश्यक असणारी माहिती देण्यासाठी पंचायत समितीबरोबर संपर्क साधणे, आदी बाबींबाबत चर्चा करण्यात आली.

या सभेस जी.एच. पाटील, डी.जी. मानकर, ए.बी. पाटील, सुरेश म्हात्रे, किशोर घरत, प्रकाश म्हात्रे, आय.के. दळवी, डॉ. राजू म्हात्रे, डॉ. रवी पाटील, प्रवीण पितळे, श्रीमती सदावर्ते, राणे, भोपी, विजय म्हात्रेंसह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version