लखीमपूर हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

। लखनऊ । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. योगी सरकारकडून एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांकडे सोपविण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव लखीमपूर खेरी घटनेची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. वाहनांच्या ताफ्याखाली चिरडून चार शेतकर्‍यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. हा ताफा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राचा होता असा आरोप आहे. यामुळे देशात मोठा तणाव आणि उद्रेक पहायला मिळत आहे.

Exit mobile version