राज्यातील सेवानिवृत्त पोलीस एकवटले

| अलिबाग । प्रतिनिधी ।

राज्यातील सेवानिवृत्त पोलिसांच्या समस्या निवारणासाठी अलिबागमध्ये शिखर संस्था मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आपल्या न्याय हकासाठी निवृत्त पोलीस अलिबागमध्ये एकवटले. निवृत्त पोलीस कल्याणकारी संस्था रायगड आयोजित हा मेळावा शिखर संस्था अध्यक्ष संपतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या मेळाव्यात निवृत्त पोलीसांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संघटीत राहून काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .

Exit mobile version