निवृत्त सैनिक अमोल उभारे यांचे निधन

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील मुळचे दाखणे गावचे सुपुत्र व सध्या माणगावात राहणारे सेवानिवृत्त सैनिक स्व.अमोल शांताराम उभारे यांचे शुक्रवारी (दि.8) जसलॉक हॉस्पिटल मुंबई येथे औषधोपचार सुरू असताना आकस्मित निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 40 वर्षांचे होते. अमोल उभारे यांनी 17 वर्षे लष्करामध्ये सेवेत राहून भारत मातेची सेवा केली. त्यांच्यावर दाखणे येथील मूळगावी शनिवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोविड नियमांचे पालन करीत जनसमुदाय अंत्यविधीला उपस्थित होता.

Exit mobile version