| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचा मुलगा यज्ञेश उभारे याचे शुक्रवारी (दि.30) अपघातात दुर्दैवी निधन झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळील नाणोरे गावानजीक घडला आहे.
अपघाताबाबत माणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आप्रोज रशीद मुजावर (24) रा.दहिवली-कर्जत याने अशोक लेलंड कंपनीची गाडी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने अतिवेगाने चालवत होता. यावेळी समोरून येणारी दुचाकी या गाडीला समोरून जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार यज्ञेश प्रभाकर उभारे याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला असून आरोपी आप्रोज रशीद मुजावर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.