| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे प्राचार्य बबन पालवे आणि चतुर्थ कर्मचारी काशिनाथ पवार यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे गुरुवारी (दि.9) एप्रिल रोजी कै नामदेवशेठ खैरे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या सेवापूर्ती सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश खैरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सेवापूर्ती सोहळ्यात प्राचार्य बबन पालवे आणि काशिनाथ पवार यांना चित्रलेखा पाटील आणि सुरेश खैरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मान पत्राचे वाचन शिंदे स्वाती, शिंदे तन्मयी यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक शिंदे यांनी केले. शेकाप आणि पाटील कुटुंबीयांनी शिक्षणाला नेहमी प्राधान्य दिले आहे. आज पर्यंत जिल्ह्यात 40 हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले आहे. तसेच या विद्यालयाच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी कोणतीही मदत लागली तर मी माझी शाळा म्हणून मदत करेल असे आश्वासन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी शेकाप पदाधिकारी, पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षक वृंद, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भूषण सुतार तर आभारप्रदर्शन महेंद्र निकुंभ यांनी केले.
नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा
