मुरुडमध्ये सेवानिवृत्तांचा सत्कार

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड येथील राधा कृष्ण मित्र मंडळातर्फे आदर्श तहसिलदार म्हणून गौरवण्यात आलेल्या वंदना मकू तसेच आरसीएफमधून सेवानिवृत्त झालेले तथा सी.एम.फांऊडेशनचे चिंतामणी मकू व बी. पी.टी. मुंबई येथील यशवंत सवाई यांचा मुरुड कोळीवाडा समाज मंदीरात प्रमुख अतिथी अ‍ॅड. रामचंद्र मांदाडकर यांच्या अध्यक्षतेखाली शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन हृद्द सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते हरीभाऊ बैले, यशवंत गोंजी, हरिश्‍चंद्र नायसाठे, विठ्ठल सवाई, दत्तात्रय चोगले, रमेश गोंजी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक करताना प्रल्हाद गोंजी यांनी कोळी समाजाच्या उत्थानासाठी समाजरत्नांचा गौरव प्रेरणादायी असुन युवकांनी त्यांचा आदर्श गिरवावा असे आवाहन केले.

Exit mobile version