परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका

तयार रोपे कलंडली, शेतकरी चिंतित

| माणगांव | वार्ताहर |

यंदा पावसाने उशिरा केलेली सुरुवात भातलागवड झाल्यापासून जोरदार पावसाने फिरवलेली पाठ त्यातच गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेली उसंत या साऱ्याचा परिणाम भातशेतीवर झाला असून या भागांतील भातपीकीवर झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच सध्या भातपिकांना कणसे करपा रोगाची मोठी लागण असून हे पीक करपून संपूर्ण शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच लांबलेल्या पावसाने भातशेती संकटात सापडली असून परतीच्या पावसाच्या तडाख्याने भातशेती कलंडू लागल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तालुक्यातील भातशेती कापणीस सुरुवात झाली आहे.

परतीच्या पावसाने झोडपलेल्या शेतातून पाणी तुंबून राहिले असल्याने कापणीच्या कामात शेतकऱ्यांना अडचणी येणारं आहेत. तयार लोंबी जमिनीकडे झुकत असल्याने पाण्याच्या संपर्काने भाताचे दाणे काळवंडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्यात जास्त काळ पेंढी राहिल्याने त्या कुजनार असून त्यामुळे पेंढ्याची वैरणही खराब होणार आहे. परतीचा लांबलेला पाऊस थांबत नसल्यानें व पाऊस सडकून पडत असल्याने कापणीसाठी तयार झालेली रोपे कलांडली आहेत. रोपे कालांडली असल्याने व परतीचा पाऊस थांबत नसल्यानें शेतकरी चिंतित झाले आहेत. 12 हजार हेक्टर क्षेत्रावर यावर्षी भातशेती लागवड झाली आहे.

भातशेती कापणीस तयार होत आहे. परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे कापणी करताना अनंत अडचणी येणार आहेत. हळवी भाते तायार असून पाऊस थांबण्याची वाट पाहत आहोत.

दत्ताराम यादव, शेतकरी, माणगांव
Exit mobile version