रेवस, बोडणीत माघी पौर्णिमा उत्साहात

| खारेपाट | वार्ताहर |
मल्हारी मार्तंड माघ पौर्णिमा उत्सव रेवस बोडणी कोळीवाडयात हजारोंच्या संख्येने कोळी बांधवांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला. रेवस-बोडणी कोळीवाड्यातून जेजुरी कडेप्रस्थान सोहळ्याची सुरुवात झाली. रेवस बोडणी गावातील सर्व कुटुंबातील देवहार्‍यातील देवांची मिरवणुक निघून भंडारा उधळतयेलकोट जय मल्हार च्या या नाम घोषात भक्तांच्या पटागणांत आनंदोत्सवात नेण्यात आले.

संपूर्ण रेवस कोळी वाडा पिवळ्या भंडार्‍याने जयघोष करीत दुमदुमून गेला. या वेळी महिला वार्गकडून आपल्या कुटुंबातील देव्हार्‍यातील देवांची उद, पुजा, आरती, करण्यात आली. तसेच खंडेरायाला साकडे घालण्यात आले की, कोळी बांधवांच्या धंद्यास बरकत होवो. येथून देवाची पालखी राम आली व तेथून जेजूरीकडे प्रस्थान झाले. विेशेष म्हणजे या सोहळ्यास रेवस बोडणी परिसरातील बालवर्ग, युवकवर्ग व कोळी बांधव भगिनिंनी आपले आपले पारंपारीक वेषभूषा करुन सांस्कृतीक नृत्य सादर करीत आपला आनंद व्यक्त केला.

हा सोहळा यशस्वी होण्यासाठी रेवस-बोडणी गावाचे अध्यक्ष अमर नाखवा तसेच रेवस-बोडणी मच्छिमार संस्थेचे चेअरमन विश्‍वास नाखवा तसेच परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व हजारोंच्या संख्येने कोळी बांधवांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version