| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा म्हणजे हिरवीगार नारळी पोफळींच्या झाडांनी पांघरलेल्या शालेवरून डोळ्यांना सुखावणारा अथांग समुद्र, त्याच्या मध्यभागी डोलणारा कोलई किल्ला आणि बाजूला भव्य रेवदंडा-आगरकोट किल्ले – कोकण म्हटलं की असंच निसर्गसौंदर्याचं अनमोल खजिनाच आहे. याच बीचवर प्रचंड गर्दी उसळली असून, हा किनारा सध्या पर्यटकांचा उत्सवमय वातावरणाने नटला आहे. रेवदंडा या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाची लहर उसळली आहे. तसेच, पापलेट, सुरमई, बांगडा, कोलंबी, शिंपल्या, खेकडे, पोपटीसारख्या कोकणातील खास मासे आणि सीफूड खवय्यांना खूप आवडत असल्याने कोळीबांधवांचा धंदाही जोरात आहे. रेवदंडा बीचवर सकाळीच मासे विकणाऱ्या कोळी महिलांच्या टपऱ्यांवर पर्यटकांची रांगा लागल्या आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रेवदंडा, नागावसह इतर किनारपट्ट्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलं आहे. समुद्रात सतर्कतेसाठी लाईफगार्ड्सची नियुक्ती, कचरा व्यवस्थापन आणि पार्किंगसाठी वेगळ्या जागा – सर्व तयारी पूर्ण झाली आहे.







