रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा ग्रामपंचायत पोट निवडणूक बिनविरोध करण्यात आली. तशी घोषणा निवडणुक अधिकारी रमेश चव्हाण यांनी केली. रेवदंडा ग्रामपंचायतीची प्रभाग दोन,तीन,चार व पाचमध्ये रिक्त झालेल्या चार जागी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. रेवदंडयातील स्थानिक आघाडी व शेकापक्षाच्या नेत्यानी एकत्रितपणे निवडणूक न घेण्याचा निर्णय केला, त्यामुळे पोटनिवडणुकीतील चारही प्रभागातील चार जागा बिनविरोध झाल्या. यावेळी दोन्ही पक्षानी भरलेले अतिरिक्त अर्ज मागे घेतल्याने निवडणूक अधिकारी रमेश चव्हाण यांनी चारही सदस्य बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.यावेळी शवसेना राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, मारूती भगत, शेकापचे शरद वरसोलकर, सदाशिव मोरे, आदी उपस्थित होते.
रेवदंडा ग्रामपंचायत निवडणूक 2018 साली झाली, यावेळी थेट निवडणुकीत शेकापक्षाचा सरपंच निवडून आला तर आघाडीचे अकरा सदस्य विजयी ठरले, मात्र प्रभाग दोन,तीन व चार मधील निवडून आलेल्या सदस्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने व प्रभाग पाच मधील सदस्या निकिता मानकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या या जागासाठी पोटनिवडणूक 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती.
आघाडीचे वतीने प्रभाग तीन मधून शिवसेनेचे नंदकुमार महादेव हाल यांचे दोन, प्रभाग दोन मधून आशा नारायण कमळ नाखवा , तर प्रभाग चार मधून मंगळा मधुकर वाघमारे यांचे दोन असे सहा उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर प्रभाग पाच मधून सुवर्णा योगेश चेरकर, व लीन किशोर मानकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. शिवसेनेने तिन व शेकापक्षाचे लिना मानकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उरलेले चारही उमेदवार बिनविरोध निवडून आले.