| रेवदंडा | प्रतिनिधी |
विविध निकषाच्या मुल्यांकनानूसार ए श्रेणीत अधिक गुण मिळवून रेवदंडा पोलिस ठाण्यास स्मार्ट आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
अलिबाग येथे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे यांच्या हस्ते रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज पोलिस निरीक्षक श्रीकांत किरविले यांनी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र स्वीकारले.
प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग, आधूनिक तंत्रज्ञान, आदी गोष्टीची पहाणी करून व मुल्यांकनात कामकाजाची दैनदिन पहाणी, स्वच्छता, दर्शनी भागातील सुशोभिकरण, विविध सुविधा, आल्येल्या व्यक्तीचे समुपदेशन, महिलांच्या सुरक्षिततेसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम, अपघात टाळण्यासाठी वाहतकीच्या नियमांचे पालन आदी विविध सोयी-सुविधाचे मुल्यांकन करून रेवदंडा पोलिस ठाण्याची स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून निवड करण्यात आली.