रेवदंडा सुरूबन मद्यपीचे अड्डे

ग्रामस्थांची कारवाईची मागणी

| रेवदंडा । वार्ताहर ।

रेवदंडा-हरेश्‍वर मार्गातील समुद्र किनारी स्थनिक, पर्यटक, पाहूणे यांना विरगुंळा म्हणून उभारलेल्या सुरू व माड बनात रात्रीस मद्यपीचे अड्डे बनले आहेत. रात्री उशीरापर्यंत दारू व बियर रिचवीत वेगळाच तमाशा सुरू असतो. सकाळी बनात दारू व बियर बाटल्यांचा खच पडलेल्या दिसून येतो. बनात बसण्यासाठी असलेले बेंचेसवर सुध्दा दारू व बियरच्या बाटल्यासह विविध चकण्याची घाण टाकलेली असते. रात्रीच्या दुरावस्थेने येथे येणार्‍या स्थानिक, पर्यटक व पै-पाहूणे यांच्या सुविधेसाठी बनविण्यात आलेल्या बनात गलिच्छपणा जाणवतो. त्यामुळे विरगुंळा म्हणून बसण्यासाठी आलेल्याचा हिरमोड होतो. या बाबत अनेकदा रेवदंडा पोलिस ठाण्याच्या निदर्शनास स्थानिक ग्रामस्थांनी आणून दिले आहे. मात्र पोलीस सुध्दा येथे रात्रीचे वेळेस फेरफटका मारत नसल्याने मद्पीचे फारच फावले आहे.

Exit mobile version