जेएनपीटीतील उपक्रमांचा केंद्रीय मंत्र्यांकडून आढावा

| उरण | वार्ताहर |
केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान गति शक्ती राष्ट्रीय योजनेअंतर्गत विकासास चालना देण्यासाठी देशातील विविध बंदरांद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ङ्गइज ऑफ डुइंग बिझनेसफ आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी केल्या जात असलेल्या विविध उपायोजनांचा व्यापक आढावा घेतला.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर, सचिव डॉ संजीव रंजन आणि सर्व प्रमुख बंदरांचे अध्यक्ष उपस्थितीत होते. आढावा बैठकी दरम्यान, सचिव डॉ. संजीव रंजन यांनी मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीवर बोलताना पंतप्रधान गति शक्ती योजने अंतर्गत स्मार्ट, मेगा व हरित बंदरे, इज ऑफ डुइंग बिझनेस आणि मेरीटाइम इंडिया व्हिजन 2030 अशा विकासाच्या सात स्तंभांवर प्रकाश टाकला.


गती शक्ती योजना पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत व्हिजनचा एक महत्त्वाचा भाग असून ह्या योजनेचा उद्देश्य अखंड कनेक्टिव्हिटी, आर्थिक विकास आणि नागरिकांसाठी सुशासन सुनिश्‍चित करणे आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी जेएनपीटी मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, प्रगत तांत्रिक उपायांसह संपूर्ण पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभता सुनिश्‍चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाड़ेल,असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जेएनपीटी प्रकल्पांमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश व मजबूत मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी तयार होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमांसोबतच, आम्ही करत असलेल्या प्रगत तांत्रिक उपायांमुळे व्यवसाय सुलभता वाढेल व उत्पादनास चालना मिळेल तसेच जागतिक व्यापारासाठी जेएनपीटी हे सर्व दृष्टीने उपयुक्त बंदर बनण्यास मदत मिळेल. – संजय सेठी, जेएनपीटीचे अध्यक्ष

Exit mobile version