। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
‘इथे’ पहा एका क्लीकवर
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org
असा पहा निकाल निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल. संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.