नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम

प्रभाग रचना कार्यक्रम 2022 जाहीर
। अलिबाग विशेष प्रतिनिधी ।
लांबणीवर पडलेल्या नगरपरिषद निवडणूकांचे पडघम वाजू लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या तसेच मुदत समाप्त होणार्‍या व नवनिर्मित अशा एकूण 208 नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम 2022 जाहीर झालेला आहे. परंतु सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.21, दि.11 मार्च 2022 अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियमामध्ये सुधारणा केल्यानंतर प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्य शासनाने करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या सुधारणेस अनुसरून राज्य निवडणूक आयोगाने दि.22 फेब्रुवारी 2022 घ्या आदेशानुसार राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या तसेच मुदत समाप्त होणार्‍या व नवनिर्मित अशा एकूण 207 नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी प्रभाग रचना कार्यक्रमाबाबत कार्यवाही अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात यावी, असे आयोगाने सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून) यांना दि.14 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दि.04 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना दि.10 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दि.10 मार्च 2022 पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतीसह सुधारीत कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणार्‍या आक्षेप व हरकतींवर सुनावणी देण्यात यावी, असे आदेशित केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी तसेच हरकती व सूचना मागविण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे.

नगरपरिषदेचे नाव: खोपोली, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: खोपोली नगरपरिषद कार्यालय, ता.खालापूर, जि.रायगड

नगरपरिषदेचे नाव: अलिबाग, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: अलिबाग नगरपरिषद कार्यालय, ता.अलिबाग, जि.रायगड

नगरपरिषदेचे नाव: महाड, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, महाड नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: महाड नगरपरिषद कार्यालय, ता. महाड, जि.रायगड

नगरपरिषदेचे नाव: माथेरान, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: माथेरान नगरपरिषद कार्यालय, ता.माथेरान, जि.रायगड

नगरपरिषदेचे नाव: मुरुड-जंजिरा, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, मुरुड-जंजिरा नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालय, ता.मुरुड, जि.रायगड
नगरपरिषदेचे नाव: पेण, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: पेण नगरपरिषद कार्यालय, ता.पेण, जि.रायगड

नगरपरिषदेचे नाव: रोहा, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, रोहा नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: रोहा नगरपरिषद कार्यालय, ता.रोहा, जि.रायगड

नगरपरिषदेचे नाव: श्रीवर्धन, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय, ता.श्रीवर्धन, जि.रायगड

नगरपरिषदेचे नाव: उरण, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणार्‍या अधिकार्‍याचे पदनाम: मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: उरण नगरपरिषद कार्यालय, ता.उरण, जि.रायगड

Exit mobile version