रियान परागची झंझावाती खेळी

12 षटकार अन्‌‍‍ 56 चेंडूत धुंवाधार शतक

| रायपूर | वृत्तसंस्था |

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागने रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर अनेक खेळाडू भारतीय संघामध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजे ठोठावताना दिसत आहेत. त्याने छत्तीसगडविरुद्ध आपल्या घरचा संघ आसामसाठी झंझावाती शतक झळकावले.

रणजी ट्रॉफीच्या ब गटातील छत्तीसगडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात त्याने 56 चेंडूत शतक झळकावले. रायपूरमध्ये त्याने 12 षटकार मारले. परागने रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले आहे. 87 चेंडूत 155 धावा करून तो बाद झाला. रियान परागच्या शतकानंतरही आसामला पराभवाला सामोरे जावे लागले. छत्तीसगडने हा सामना 10 गडी राखून जिंकला.

रियान परागने रणजीमध्ये दुसरे सर्वात वेगवान शतक ठोकले आहे. या बाबतीत ऋषभ पंत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2016 मध्ये झारखंडविरुद्ध दिल्लीसाठी 48 चेंडूत शतक झळकावले होते. परागनंतर नमन ओझा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओझाने 2015 मध्ये मध्य प्रदेशकडून 69 चेंडूत शतक झळकावले होते.

Exit mobile version