31 ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन
| अलिबाग | प्रतिनिधी |
खरीप हंगामात शेतकर्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भातपीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, मोठ्या संख्येने शेतकर्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे. सध्याच्या पीक स्पर्धेतील महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके आहेत. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात भात दि.31 ऑगस्टपर्यंत द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतितालुका किमान स्पर्धक संख्या
सर्वसाधारण गटासाठी दहा व आदिवासी गटासाठी पाच. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थींच्या शेतावर त्यापिकाखाली किमान दहा आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.
तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी पाच व आदिवासी गटासाठी चार आहे. सर्व गटांसाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300 इतके प्रवेश शुल्क आहे.
पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीस स्वरुप
तालुका पातळी-सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये पहिले बक्षीस पाच हजार, दुसरे तीन हजार, तिसरे बक्षीस दोन हजार. जिल्हा पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट पहिले बक्षीस दहा हजार, दुसरे सात हजार, तिसरे बक्षिस पाच हजार. विभाग पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट ः पहिले बक्षीस 25 हजार, दुसरे 20 हजार, तिसरे बक्षीस 15 हजार. राज्य पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे बक्षीस 40 हजार, तिसरे बक्षीस 30 हजार.
पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या ुुु.ज्ञीळीहळ.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. खरीप हंगाम 2022 स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभागी व्हावे.
उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी