भातपीक प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिबीर

| रसायनी | वार्ताहर |

पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी चावणे येथे यूएनडीपी अंतर्गत भातपीक प्रात्यक्षिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या भक्ती म्हात्रे यूएनडीपी प्रकल्प सहयोगी (कृषी) यांनी यूएनडीपी प्रकल्पाबाबत माहिती दिली, तसेच भातपिकाच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, भगवान हेगडे, मंडळ कृषी अधिकारी, पनवेल यांनी भातलागवडीच्या विविध पद्धती व त्यामधील खत व्यवस्थापन व किडरोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. म.ग्रा.रो.ह.यो लागवड व भातपीक विमा 15 जुलैच्या आत लवकरात लवकर काढण्यासाठी शेतकऱ्यास विनंती केली व कृषी विभागातील योजनांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास के.टी. बिचूकले कृप पनवेल 2, सचिन पवार तंत्र सहाय्यक पनवेल, दिनेश ढालपे, कृस तारा, विजय नलावडे ग्रामसेवक, केशर पाटील, गीता ठाकूर एनजीओ प्रेरणा संस्था प्रतिनिधी तसेच चावणे सरपंच सुप्रिया सोनावळे, सदस्य गणेश सरदार, भगवान देशमुख, प्रगतीशील शेतकरी व शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विविध योजनांबाबत मार्गदर्शन प्राजक्ता काटकर यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन व भातपीक विमा कॅम्पचे नियोजन प्रसाद पाटील यांनी केले.

Exit mobile version