भात लागवडीचे प्रात्यक्षिक

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील सांगडे येथे कृषीनिष्ठ शेतकरी केशव खरिवले यांच्या आपल्या भातशेतीमध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी केशव खरिवले यांच्या शेतावर यंत्राच्या साह्याने भात लागवड करण्यात आली. या प्रात्यक्षिकाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी एम. बी. करे यांनी केले. यावेळी माणगाव उपविभागीय कृषि अधिकारी कावळे, मंडळ कृषी अधिकारी ए.एस. सुतार, के.डी.दोरूगडे, पी.ए. उबाळे, पी.एस. राक्षीकर, संदेश थळे, मारुती तुपकर, महेश तुपकर, शिवाजी मुटके, संदेश थळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version