नेरळ येथील भात खरेदी केंद्र सुरु

नेरळ सोसायटीकडे 778 शेतकर्‍यांची नोंद
। नेरळ । प्रतिनिधी ।
राज्य सरकारच्या वतीने राज्य मार्केटिंग फेडरेशन कडून चालविण्यात येत असलेल्या आधारभूत किंमतीचे भाताची खरेदी करणारे केंद्र नेरळ येथे सुरु झाले. नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी नेरळ येथे भाताची खरेदी केंद्र असून त्यासाठी नेरळ सोसायटी मधील 778 हुन अधिक शेतकर्‍यांनी नाव नोंदणी केली आहे.
नेरळ येथील भात खरेदी केंद्राचे उद्घाटन नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजेंद्र हजारे यांचे हस्ते झाले. त्यावेळी ममदापुर येथील शेतकरी वाळकू नारायण शिनारे यांचा पहिला भात यावेळी शुभारंभ म्हणून खरेदी करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र विरले, संचालक विष्णू कालेकर, सुहास भगत, सावळाराम जाधव, पौर्णिमा राऊत, मधुकर गवळी, जनार्दन कांबरी, मधुकर भागीत, शरद देशमुख, गणपत भुंडेरे, दयानंद गवळी, अनिल भागीत, दिलीप शेळके आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील 11 ग्रामपंचायती यांचा समावेश नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीमध्ये अंतर्गत असून त्या गावातील 777 शेतकर्‍यांनी आतापर्यत आपल्या भाताची नोंद केली आहे.

Exit mobile version