रिक्षा आणि कारचा अपघात; पाच जण जखमी

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुका हद्दीत गोरेगाव म्हसळा रस्त्यावर ताम्हणी करंबे फाट्या जवळ रिक्षा आणि कारचा अपघात होऊन यामध्ये प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैदकीय अधिकारी यांनी व्यवस्थित चौकशी न करता फक्त प्रथमोपचार करूनच माणगाव उपरुग्णालयात जाऊन खाजगी ठिकाणी सिटी स्कॅन आणी एक्स-रे काढन्यासाठी रेफर दिला. यामध्ये अपघातामध्ये जखमी झालेले सर्व रुग्णांना जवळपास 2 तास प्रतीक्षेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसेचे म्हसळा तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी यावर लक्ष घालत हा प्रकार उघड केला.



या अपघातामधील फ्रॅक्चर महिलेला जवळ पास 2 तास प्रथमोपचार करून स्ट्रेचर वर बसून ठेवण्यात आले. संबंधित वैदकीय अधिकाऱ्यालाच जर शासकीय रुग्णालयावर विश्वास नसेल तर सर्वसामान्य जनतेने कस उपचार घ्यावे याबाबत पण प्रश्न निर्माण झाल्याने मनसेने याची दखल घेतली आहे. प्रशासकीय वैद्यकीय अधिकारीच जर सामान्य जनतेची सेवा करायची सोडून मेवा खाण्यात व्यस्त असतील तर वरिष्ठ अधिकारी या वर कोणती कारवाई करतात या वर जनतेची नजर असेल. असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी दिला आहे.

 ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे काही महिने आधीच जनतेचा लाखो रुपयाचा निधी खर्च करून क्ष-किरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पण क्ष- किरण तंत्रज्ञ पद रिक्त असल्याने ति मशीन धूळ खात आहे व जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल रुग्णालयात आवाज उठवून रुग्णाची मदत करत या अपघातात बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (सौरभ गोरेगावकर- मनसे तालुका अध्यक्ष म्हसळा)
Exit mobile version