| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा येथे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता एसटी आणि टाटा कार यांची धडक होऊन एक विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली. एस.टी. ही स्वारगेटकडून म्हसळा श्रीवर्धनकडे येत असताना साई चेकपोस्टजवळ म्हसळा शहरा कडून जाणारी (टाटा आर्या)मोटार कार एसटीला धडकली आणि ती रस्त्याचे बाजूच्या नाल्यामध्ये कलंडून अपघात झाला. अपघातामध्ये चिरगाव येथील शाळेकरी प्रवाशी मुलगी आर्या पाडावे किरकोळ जखमी झाली.
तीला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करून घरी पाठविले. बस चालकाच्या पायाला व हाताला मार लागला असल्याचे सांगण्यात आले. अपघातात मनुष्य हानी झाली नसली तरी अपघाती गाड्यांचे नुकसान होऊन वित्त हानी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे आणि पोलिस पथक तसेच स्वंयसेवी नागरिकांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.