भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथे बुधवारी (दि.14) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. कल्याण येथील रिक्षा उरणहून सायंकाळी 6 वाजता परतत असताना पनवेल-उरण मार्गावरील दास्तान फाटा येथे रिक्षा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या रिक्षाने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या पोलला इतकी जोरदार धडक दिली की, रिक्षा चालक नानू राठोड जागेवरच मृत्युमुखी पडला.

या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. अंगावर शहारा आणणार्‍या या अपघातात रिक्षा चालकांची अतिघाई जबाबदार ठरली. या घटनेत रिक्षात बसलेले नानू राठोड याचे काका मात्र बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली. पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत.

Exit mobile version