काळ नदी पुलाजवळ कचर्‍याच्या दुर्गंधीने रिक्षा चालक हैराण

माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरीत मुंबई-गोवा महामार्गावर काळ नदी पुलाजवळ रस्त्याला लागून कचरा टाकला जात आहे. या कचर्‍याच्या दुर्गंधीने रिक्षा चालक, प्रवासी, नागरिक हैराण झाले असून, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे नगरपंचायतीने लक्ष देऊन हा कचरा टाकू नये, अशी पाटी लावावी, शिवाय याठिकाणी कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

माणगाव काळ नदी पुलाजवळ मच्छी मार्केट ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यालगत माणगाव-लोणेरे मार्गावर चालणार्‍या मिनीडोअर रिक्षा तसेच घरोशीवाडी याठिकाणी पूर्व विभागाकडे चालणार्‍या मिनिडोअर रिक्षा चालत असतात. या रिक्षा चालक, मालकांना, प्रवाशांना व येथून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना या कचर्‍याच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे. सध्या जगावर कोरोना नामक महामारीचे संकट आहे. त्यामुळे स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. महामार्गावर हा कचरा टाकला जात असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रश्‍नाकडे नगरपंचायतीने लक्ष देवून येथील कचरा उचलावा तसेच याठिकाणी कचरा टाकणारे कोणी आढळल्यास अथवा कोणी त्यांच्याबद्दल तक्रार केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version