पनवेलमध्ये रिक्षाची चोरी

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

पनवेलमधील टपाल नाक्याजवळून रिक्षाची चोरी झाल्याची घटना घडली . या प्रकरणी अक्षय बबन बहीरा याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरी झालेल्या रिक्षेचा नंबर एम.एच. 46 ए.झेड. 6683 असा आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या बाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मोनाली चौधरी करत आहेत.

Exit mobile version