। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या आयपीएल हंगामात एका षटकात 5 षटकार मारून चर्चेत आलेल्या अलिगढचा 26 वर्षीय डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला राखीव खेळाडू म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. तर निवडकर्त्यांनी शिवम दुबेचा समावेश केला आहे.
आयपीएलमधील बीसीसीआयच्या एका नियमामुळे पॉवर हिटर रिंकू सिंगचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण त्याला क्रिझवर जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. रिंकूला इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा फटका बसत असल्याचे बोलेल जात आहे. तर, आयपीएलच्या चालू हंगामातील पहिल्या 10 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी क्रीजवर जास्त वेळ घालवल्यामुळे दुबेला भारतीय संघात संधी मिळाली.