| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड व खांब या दोन्ही नाक्यांवरील गटारांचे काम अर्धवट आहेत. गटारावरील झाकणही उघड्या स्थितीत असून, यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
कोलाड-खांब नाक्यावरील गटाराचे काम तीन वर्षांपूर्वी सुरु केले; परंतु आजतागयत या गटारांचे काम अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी गटाराचे काम केले आहे त्या ठिकाणी गटाराचे झाकण निकृष्ट दर्जाचे असून, ते तुटलेले आहेत. तर काही ठिकाणी अद्यापही गटाराला झाकण बसवलेले नाही, यामुळे गेल्या कोलाड नाक्यावर एक छोटा मुलगा गटारात पडून गंभीर जखमी झाला होता. शिवाय खांब नाक्यावर आठ दिवसांपूर्वी एक महिला गटारात पडून जखमी झाली. सुदैवाने कोलाडमधील लहान मुलगा व खांबमधील महिला थोडक्यात बचावली. त्यामुळे गटाराचे काम असेच अर्धवट राहिले तर एक दिवस हे या गटारात पडून कोणाचा तरी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गटाराच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच मच्छरचे प्रमाणही वाढले असून, यामुळे रोगाराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.