। उरण । वार्ताहर ।
उरण तहसील कार्यालयात लोंबकळणाऱ्या वायरींमुळे रात्री अपरात्री शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका निर्माण झालाआहे. आग लागण्याची घटना घडली तर कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे, संगणक जळून नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय महसूल विभागाशी निगडित कामकाज, इतर शासकीय कामकाज हे तहसील कार्यालयात चालत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, भांडवलदार आणि नोकरदार वर्ग हे आप आपली कामे उरकून घेण्यासाठी संबंधित तालुका तहसील कार्यालयात ये-जा करत असतात. शासनाला लाखो रुपयाचा महसूल मिळवून देणार्या अशा महत्त्वाच्या तहसील कार्यालयाना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे उरण तालुक्याचे तहसील कार्यालय हे देता येईल. या तहसील कार्यालयाला आजही अनेक समस्यांनी ग्रासले आहे.त्यामुळे सर्व सामान्य जनतेची हेलसांड होत आहे.
त्यातच उरण तहसील कार्यालयाला विद्युत पुरवठा करणार्या इलेक्ट्रॉनिक्स वायर ठिक ठिकाणी लोंबकळत आहेत. तसेच विद्युत पुरवठा करणारी इलेक्ट्राँनिक्स साहित्य उघडे पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तसेच रात्री अपरात्री कार्यालयात शाँट सर्किटमुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर रात्री अपरात्री तहसील कार्यालयात शाँट सर्किटमुळे आग लागण्याची परिस्थिती उद्भवली तर आगीच्या भक्ष्यस्थानी महत्त्वाचे कागद पत्रे, संगणक जळून जाण्याचा संभव आहे.तसेच जीवितहानी होण्याचा संभव आहे. तरी अशा लोंबकळत असणार्या विद्युत वाहक वायरांमुळे, शाँट सर्किटमुळे कार्यालयात आग लागण्याची वाट न पाहता तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी तातडीने यांची खबरदारी घ्यावी अशी मागणी ये- जा करणारे नागरी करत आहेत.