रितेश देशमुख ‘वेड’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागोठण्यात

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागमधील सर्वच ठिकाणे आता पर्यटकांसाठीचे आकर्षण बनले असून अनेक कलाकार अलिबागच्या दिशेने आपली पावले टाकत आहेत. अनेक चित्रपटांच्या शूटिंगसाठी दिग्ग्ज कलाकार अलिबागला भेट देत असतात. ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखले जाणारे अलिबाग अनेक कलाकार व नामवंत खेळाडू यांचे घर बनले आहे. चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख हा आता याच्या नविन चित्रपटाच्या शूटींगसाठी अलिबागमध्ये आला आहे. रितेश देशमुखच्या ‘वेड’ नावाच्या नवीन मराठी चित्रपटाची शूटींग अलिबागमधील नागोठणे टाउनशिप येथे सुरू असून रितेश देशमुख हा शूटींगसाठी तिथे हजर झाला आहे. या चित्रपटाच्या लोकल प्रोडक्शनचे काम हे अलिबागमधील एस के प्रोडक्शन बघत आहेत या चित्रपटात लोकल लोकांच्या कास्टिंगचे काम सचिन शिंदे आणि योगेश पवार हे करत आहेत

Exit mobile version