फॅशन शोमध्ये दुसर्या क्रमांकाचा मानकरी
चित्रलेखा पाटील यांच्याकडून विशेष सत्कार
रेवदंडा | वार्ताहर |
स्वॅग एंटरटेनमेंट बॉलिवूड फॅशन शोमध्ये रेवदंडा येथील रितेश जैन याने यश मिळविताना महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. त्याच्या या यशाबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
मुंबईत अंधेरी येथे दि. 23 ऑक्टोबरला झालेल्या स्वॅग एंटरटेनमेंट बॉलिवूड फॅशन शो स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेत 15 मिस्टर व 15 मिसेस स्पर्धक होते. रितेश जैन यांनी ट्रडिशनल आणि वेस्टन हे दोन लॉक केले. ही स्पर्धा अनिल भालेराव व राजिप बजाज यांनी आयोजित केली होती.
रेवदंडा येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय रितेश जैन याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. मात्र, फॅशन शोची मोठी आवड व छंद असल्याने त्याने या क्षेत्रात सहभाग घेण्याचा निश्चय केला होता. त्याला अलिबागचे कोरोग्राफर निकेत नाईक यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
शेकापच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी त्याचा विशेष सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शेकापचे अलिबाग पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, ओमकार काटले व निकेत नाईक आदींची उपस्थिती होती.