रशियासाठी दोघांची निवड
| खरोशी | वार्ताहर |
नुकत्याच पालमपुर हिमाचल प्रदेश येथे युनिफाईट आसोशिएशन इंडिया यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय युनिफाईट स्पर्धेत रितुल रवींद्र म्हात्रे आणि यश उदय जोशी यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. रशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोघांची निवड झाली आहे. पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेत शिहान रवींद्र म्हात्रे व सेन्साय प्रथमेश मोकल यांच्याकडे युनिफाईटचे प्रशिक्षण घेत आहेत.
त्यांच्या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव उंचावल्यामुळे दोघांचे युनायटेडचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र युनिफाईटचे सचिव मंदार पनवेलकर तसेच युनिफाईटचे महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष खंदारे यांनी अभिनंदन केले आहे. युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे पदाधिकारी व प्रशिक्षक विनित साठे, सागर कोळी, चिंतामणी मोकल, पियुष सदार्वते, प्रशांत गागुर्डे, निलेश भोसले, प्रतिक करांडे, निलेश ओव्हाळ, अदित्य तेरेदेसाई, प्राजक्ता तेटमे, रविना म्हात्रे, जान्हवी वनगे, शार्दुल बामगुडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.