| उरण | वार्ताहर |
चौथी अॅथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा तिरुवनंतपुरम केरळ येथे दि. 18 ते 22 मेदरम्यान संपन्न झाली. या स्पर्धेत देशातील प्रत्येक राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. तब्बल 5500 खेळाडूंनी यात सहभाग घेतले होते. या स्पर्धेत योगा विथ पूनम उरणचे योग शिक्षिका सहभागी झाले होते. या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावून यश प्राप्त केले आहे. त्यामुळे उरणचे नाव आता सातासमुद्रापलीकडे गेले आहे.
शिक्षक राम चौहान यांनी गोळाफेक व भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकविला आहे. राम चौहान हे उरण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल उरण येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. योग शिक्षिका पूनम चौहान यांनी 10 किलोमीटर धावणे प्रथम क्रमांक, तर 1500 मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला आहे. पूनम चौहान या उत्तम योगा शिक्षिका आहेत. अशा प्रकारे यश प्राप्त केलेल्या या उरणमधील दोन्ही शिक्षकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.