| अलिबाग | प्रतिनिधी |
फिरायला आणि सुट्ट्यांचा आनंद लुटायला अतिशय प्रसिद्ध आणि सर्वांनाच प्रिय असलेलं अलिबाग आता अनेक कलाकारांसाठीचं आकर्षण बनले आहे. अभिनेत्री रिया चक्रबर्ती ही नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या रिया ही अलिबागमध्ये सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहे. ती सध्या अलिबाग मधील लोणारे येथील कासा पामेरा या व्हिलामधये राहत असून नुकतेच तिने याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकतंच रियाने इनस्टाग्रामवर अलिबागमधील सुट्ट्यांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या हॉलिडे होमची झलक दाखवली आहे. त्यासोबतच ती तिच्या सुट्ट्या छान एन्जॉय करत असल्याचेही दिसत आहे.
अभिनेत्री रिया चक्रबर्ती अलिबागमधील ‘या’ हाॅटेलमध्ये करतेय एन्जॉय
