पेण नगरपरिषदेतर्फे रस्ता सुशोभीकरण अभियान

| पेण | प्रतिनिधी |

जिल्हाधिकारी, रायगड अलिबाग यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता अभियान घेवून रस्त्याचे सौंदयींकरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पेण नगरपरिषदेचे मुख्य प्रवेशद्वारापासून धरमतर रोड येथे स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. सदर अभियाना अंतर्गत रस्त्यालगत असलेली गटारे स्वच्छ करण्यात आली. तसेच दूभाजक लगत साठलेली माती काढून दूभाजक स्वच्छ करण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी स्टील ट्वीनबीन बसविण्यात आले. अतिरिक्त वाढलेल्या झाडांची छाटणी करण्यात आली. विद्युत पोल सुस्थितीत करण्यात आले.

रस्ता रुंदीकरणामध्ये व्यवसायीकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा औषध फवारणी करण्यात आली. या अभियानात मुख्याधिकारी जीवन पाटील, सुहास कांबळे नगर अभियंता शिवाजी चव्हाण आरोग्य निरिक्षक, अंकिता इसाळ स्वच्छता अभियंता, रेश्मा करबेले विद्युत अभियंता, निकिता पाटील संगणक अभियंता, महेश वडके, उमंग कदम, भरत निंबरे, किशोर जाधव, दिलीप गायकवाड स्वच्छता निरिक्षक, गौतम मोरे व इतर कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, पत्रकार बंधू उपस्थित होते. स्वच्छता अभियानकरीता एक जेसेबी, एक ट्रॅक्टर व पेण नगरपरिषदेचे 60 कायम व कंत्राटी सफाई कामगारांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आले. सदर अभियान पेण नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व नागरीक असे एकूण 130 जणांच्या मदतीने यशस्वी करण्यात आले. अभियानादरम्यान 0.80 कि.मी. रस्ता स्वच्छ करण्यात आला व एक ते दोन टन कचरा गोळा करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आंबेगाव येथे वाहतूक करण्यात आला.

Exit mobile version