| पेण । वार्ताहर ।
जिल्हयाधिकार्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पेण नगरपरिषद मार्फत गुरुवार (दि.06) रोजी कासार तलाव येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर अभियाना अंतर्गत तलावातील स्वच्छता करण्यात आली. तसेच तलावाच्या सभोवताली असलेल्या फुटपाथ वरील स्वच्छता करण्यात आली. अभियानासाठी मुख्याधिकारी तथा प्रशासक उपस्थित होते. तसेच माजी नगरसेविका अॅड. तेजस्विनी नेने, माजी नगरसेवक दिपक गुरव, संतोष पाटील, डॉ. अजय कदम, डॉ. संदीप चौधरी, डॉ. शशिकांत गाढे, डॉ. मनिष वनगे, डॉ . सोनाली वनगे, श्री. शहा, दिपश्री पोटफोडे, तन्वी हजारे, अॅड. नंदू म्हात्रे व वकिल क्षेत्रातील इतर मंडळीं, सचिन शिगवण, राजाराम नरुटे, अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण, उमंग कदम, प्रशांत ढवळे, दिलीप बांधणकर, गौतम मोरे, राजू चव्हाण, महेंद्र गाडेकर, कर्मचारी, सफाई कामगार, कंत्राटी सफाई कामगार, मुकादम ठेक्यातील मुकादम, व पेण शहरातील नागरिक उपस्थित होते. या अभियानाची सांगता स्वच्छतेची शपथ घेवून तसेच उपस्थित विद्यार्थी व सर्व नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देउन करण्यात आले व पेण शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ पेण सुंदर पेण हा संदेश देण्यात आला.