सावित्रीच्यालेकी मार्फत आभार कार्यक्रम
| अलिबाग । वार्ताहर ।
को.ए.सो. मेढे विभाग इंग्रजी शाळा, मेढे येथे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रज्वल खैरे, रुपाली सुतार यां दिव्यांगाना सायकल व साहील एैनकर (अष्टमी) याला व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे को.ए.सो.मेढे विभाग इंग्रजी शाळा, मेढे शाळेतील 110 विद्यार्थ्यांनींना सावित्रीच्या लेकी पुढे चालल्या या संकल्पनेतील सायकली मिळाल्या होत्या त्याबद्दल चित्रलेखा पाटील यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम पार पडला.
सदर प्रसंगी दिनाभाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदु म्हात्रे, को.ए.सो. मेढे शाळेचे चेअरमन लक्ष्मण महाले, मुख्याध्यापक र. रो. पाटील, दाईटकर, हेमंत ठाकूर, खांडेकर अण्णा, गौरी चितळे, राज जोशी, महादेव शाब्बासकर, अवधूत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. म्हात्रे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. भोनकर यांनी केले.