मार्केट यार्डकडे जाणारा रस्ता खड्ड्यात

| नवीन पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील मार्केट यार्डकडे जाणारा रस्ता खड्ड्यात गेला आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने कशी चालवायची, असा यक्षप्रश्‍न येथे येणार्‍या वाहन चालकांना पडला आहे.

पनवेल शहरातील मार्केट यार्ड रोडवरील रेसिडेन्सी सोसायटीच्या समोरील हा वर्दळीचा रस्ता आहे. सकाळी मोठ्या प्रमाणात वाहने येथून ये-जा करतात. मात्र, मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडल्याने वाहन कुठून चालवायचे, असे प्रश्‍न वाहन चालवताना व नागरिकांना सतवत आहे. पनवेल महानगरपालिका झालेली असली तरीदेखील बरेचशे रस्ते खड्ड्यातच आहेत. पनवेल शहराला खड्डेमुक्त करून नागरिकांना होणार्‍या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी पनवेलकर करत आहेत.

मार्केट यार्डकडे जाणारा रस्ता हा महत्त्वाचा रस्ता आहे. सकाळी भाजी विक्रेते तसेच भाजी विकत घेणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. खड्डेमुक्त रस्त्याचा मनस्ताप वाहन चालकांना होतो. परिणामी, वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. असे असले तरीदेखील पनवेल महानगरपालिका खड्डे बुजवण्यासाठी काहीही करत नसल्याचे समोर आले आहे

Exit mobile version