। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली येथील स्टील मार्केट जीविका हॉटेल येथील रिक्षानाक्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. सततच्या पावसामुळे सगळीकडे पाणी साचले होते. त्यामुळे रिक्षा मालक तसेच रिक्षा प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
या संदर्भात रामदास पाटील, विश्वास पेटकर यांनी पनवेल महानगरपालिका प्रभाग (9) चे वार्ड आधिकारी कवठे यांची भेट घेऊन तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. यावेळी दिलीप पाटील, हिरामण भोईर, अरविंद कडव, विवेक गडकरी, राणा देवरमनी, काशीनाथ पाटील, प्रदिप पाटील व रिक्षामालक मोठया संख्येने उपस्थित होते. याबाबत प्रभाग अधिकारी कवठे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानूसार रिक्षा नाक्याची दुरुस्ती पनवेल महानगरपालिकेने सुरु केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कळंबोलीत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु
