कुरुळमध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

चित्रलेखा पाटील यांचे विशेष प्रयत्न

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळत असून, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला जात आहे. याच अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील कुरुळमध्ये चित्रलेखा पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून, तसेच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अवधूत पाटील आणि ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि.25) चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे पंचायत समिती माजी सभापती सुरेश पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, ॲड. सतीश नाईक, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अवधूत पाटील, रेश्मा पाटील तसेच कुरुळमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील या मतदारसंघातील गावागावांत विकासकामे पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासोबतच आवश्यक विकासकामांसाठी पाठपुरावा केला जात आहे. ग्रामीण भागातील रस्ते हे गावाच्या विकासाचे महत्त्वाचे माध्यम असून, नागरिकांची दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते असणे आवश्यक आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या या कामामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार असून, गावातील पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे. दरम्यान, कुरुळ येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ हा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून गावाच्या विकासाला चालना मिळत असून, कुरुळमधील या रस्त्याच्या कामामुळे विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

Exit mobile version