| पनवेल | वार्ताहर |
शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पाठपुराव्यामुळे कळंबोलीतील राम मंदिराच्या जवळील रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिर, कळंबोली याठिकाणी होणाऱ्या रामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. त्या पाश्वभूमीवर राम मंदिराच्या लगतच रस्ता नवीन करण्यात यावा यासाठी शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेऊन आयुक्तांनी त्याला मान्यता दिली व तेथील कामास सुरुवात केली. या त्याबद्दल त्यांनी आयुक्तांचे आभार मानून सदर ठिकाणी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.