। चिरनेर । वार्ताहर ।
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने गणपती बाप्पा लवकरच गणेशभक्तांच्या घरोघरी विराजमान होणार आहेत. मात्र चिरनेर गावातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. गणपती बाप्पांचा भक्तांच्या घरोघरी जाण्याचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी चिरनेर येथील प्रसिद्ध पी.पी. खारपाटील कंट्रक्शन कंपनीतर्फे गावातील मुख्य रस्त्यांवर म्हणजेच शिवाजी चौक ते मोठे भोम पर्यंतचा अगदी चाळण झालेल्या रस्त्याची खडी ग्रिट टाकून खड्डे भरून त्यावर रोलर फिरवून रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे.
त्यामुळे आता गणपती बाप्पांचा प्रवास सुखरूप होणार आहे. यावेळी पी.पी. खारपाटील कंन्स्ट्रक्शन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ करण्यात आला. तर याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, रमेश फोफेरकर, सविता केणी, धनेश ठाकूर तसेच चिरनेर ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य उपस्थित होते. चिरनेर ग्रामपंचायती मार्फत गावातील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याची तसेच इतर अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फी वाढलेले गवत काढून साफसफाई करण्यात आली.