रस्त्यालगतचे होर्डिंग्ज धोकादायक

। रसायनी । वार्ताहर ।

वादळी वार्‍यामुळे घाटकोपर येथील होर्डिंग्ज कोसळून अनेक निष्पापांचा जीव गेला. या घटनेवरून राज्यभरात अनधिकृत होर्डिंग्जचा विषय ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडीटच्या सुचना तर काही ठिकाणी होर्डिंग्ज मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. असेच मोठमोठे होर्डिंग्ज दांडफाटा, टाटापॉवर हाऊस, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांलगत, रिस, टिसीआय गोडाऊनजवळ, सेबी एमआमडीसी वळण आदी ठिकाणी उभारण्यात आले आहेत. वादळी वार्‍यामुळे हे होर्डिंग्ज कोसळून मोठी मनुष्यहानी होऊ शकते. या होर्डिंग मालकांना नोटीसा द्याव्यात. तसेच, धोकादायक होर्डिंग्ज त्वरीत हटविण्यात यावेत, अशी मागणी रसायनीकर करत आहेत.

Exit mobile version