| पनवेल | वार्ताहर |
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील नावडे फाटा पुलावर एका दुचाकीस्वाराला त्रिकुटाने लुटले. दुचाकीस्वार विद्यार्थी मित्राचा वाढदिवस साजरा करुन कल्याण ते कामोठे या मार्गावर प्रवास करताना त्याची लूटमार करण्यात आली. तळोजा पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. मुंब्रा पनवेल महामार्गापासून हाकेच्या अंतरावर नावडे फाटा पुलावर ही घटना घडली. तीन अनोळखी तरुण दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी विद्यार्थ्याची दुचाकी रस्त्यांलगत लावण्याचा इशारा केला. विद्यार्थ्याने दुचाकी थांबवल्यावर त्रिकुटाने दुचाकीची किल्ली काढून घेतली. त्याच्या गळ्यातील 40 हजार रुपयांची सोनसाखळी खेचून त्रिकुटाने पळ काढला.